Blogger templates

Thursday, January 22, 2015

किचन टीप्स ( Kitchen Tips )

No comments :
1) आले-लसूण पेस्ट जास्तीची जर करून ठेवायची असेल तर त्यामधे एक चमचाभर तेल घाला चांगली टिकते व रंगही बदलत नाही.

2) गुळ-पोळी बनविताना गुळामधे थोडासा चूना घालावा.गुळ पोळी फूटून बाहेर येत नाही.

3) कणिक भिजवताना कोमट पाणी वापरले तर पोळ्या अतिशय मऊ होतात व रंग पण पांढरा येतो.

4) शेंगदाणे भाजल्यावर कढईमध्ये थोडे मिठ टाकावे व त्यावर दोन मिनिट झाकण  ठेवावे म्हणजे शेंगदाण्याची साले सहज व पट्कन निघतात.

5) साखरेला मुंगया येऊ नयेत म्हणून त्यात चार-पाच लवंगा टाकाव्यात.

6) गूळपोळीचा गुळआधी खिसावा लागतो मग मळून घ्यावा लागतो . तर ही कृती किचकट असते तर ,काय करावे ,गुळ कुकरच्या डब्यामध्ये घालावा व दोन शिट्टया काढाव्यात .छान मऊ गुळ तयार !

7) आपण इडली पिठ आणतो किंवा घरी तयार करतो पण काहीवेळा त्यातील पिठ शिल्लक रहाते व आपण ते फ्रीजमध्ये ठेवून देतो पण तरीसुद्धा ते आंबट होते. तर ते ठेवताना त्यात भरपूर पाणी घालावे म्हणजे ते आंबत नाही .वापरताना वरचे पाणी अलगद काढून टाकावे . 

8) कणीक भिजवताना कोमट पाणी वापरावे .म्हणजे पोळ्या अतिशय मऊ होतात. 

9) कडधान्याला लवकर मोड येण्यासाठी भिजवलेले धान्य प्रीहीट ओवेन करून बंद करावा व त्यामध्ये रात्रभर ठेवा.किवा प्रेशर कुकर गरम करून घ्यावा व त्यात ठेवून झाकण बंद करावे व रात्रभर राहू द्यावे. छान मोड येतात. 

10) रव्यामध्ये जळमटे,किडे होऊ नये म्हणून बाजारातून आणल्यावर किंचित कोमट करून मग थंड झाल्यावर डब्यात भरावा. 

No comments :

Post a Comment